१. भारतीय उपखंड आणि इतिहास
१. भारतीय उपखंड आणि इतिहास
१.१ इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये १.२ भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये १.३ भारतीय उपखंड
१.१ इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये इयत्ता पाचवीत आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो, हे विस्ताराने पाहिले. आदिमानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते, हे पाहिले. अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषिप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला, याचा आपण आढावा घेतला.
इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत. या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. यांपैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते.
चला, चर्चा करू.
तुमच्या परिसरात कोणकोणते
व्यवसाय आहेत?
• तुमच्या परिसरात कोणकोणती पिके
घेतली जातात?
घरांचे प्रकार
आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात.
समाजजीवनसुद्धा त्यांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्ये आणि भाज्या कमी प्रमाणावर उपलब्ध असतात, तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात. परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून रहावे लागते. अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवनपद्धतीतील इतर गोष्टींमध्येही फरक आढळतो. त्याचा
Comments
Post a Comment