५ ) प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह

 ५ ) प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह

प्रश्न आणि उत्तरे


१ ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा

१ ) जैन धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे.

२) सर्व प्राणीमात्रांविषयी ची करुणा हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण विशिष्ट होते.

२ ) थोडक्यात उत्तरे द्या.

१) वर्धमान महावीर यांनी कोणती शिकवण दिली?

उत्तर=

  1. मनुष्याचा मोठेपणा त्यांच्यावर वर्णवर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो, अशी शिकवण दिली.
  2. स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते, मात्र वर्धमान महावीर यांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला.
  3. सर्व प्राणीमात्रावर प्रेम करा
  4. मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करून असू द्या
  5. जगा आणि जगू द्या असा उद्देश त्यांनी केला

२) गौतम बुद्धाचे कोणते वचन विख्यात आहेत यातून कोणते मूल्य प्रकट होतात?

उत्तर=


३) ज्यू धर्माच्या शिकवणीत कोणत्या गुणांवर भर दिलेला आहे?

उत्तर=

देव एकच आहे, असे ज्यू धर्मीय मानतात. ज्यू धर्माचा शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे, आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. त्यांच्या प्रार्थना स्थळाला सिनेगॉग असे म्हणतात.

४ ) ख्रिश्चन धर्मा मध्ये काय सांगितले आहे?

उत्तर=

आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील. चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे, तसेच ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितले आहे. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे. येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानव जातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते. ख्रिस्त लोकांच्या प्रार्थना स्थळाला चर्च असे म्हणतात.

५ ) इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते?

उत्तर=

इस्लाम हा एकेश्वर वाद मानणारा धर्म आहे. अल्ला एकच असून मोहम्मद पैगंबर त्यांचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबर यामार्फत पवित्र पुरानिया धर्मग्रंथातून प्रकट झालेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. या शब्दाचा अर्थ त्याला शरण जाणे असाही होतो. अल्ला सर्वशक्तिमान आणि परम दयाळू आहे, असे इस्लाम मध्ये सांगितले आहे.

६) पारशी विचारसरणीचा गाभा कोणता आहे?

उत्तर=

उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती हे तीन प्रमुख आचारण तत्वे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे

४ ) खाली दिलेल्या पंचमहावर्ते आणि त्रिरत्ने यांचे तक्त्यात वर्गीकरण करून लिहा.

उत्तर=

पंचमहावर्ते :- अहिंसा, सत्य, अस्तेय , परी ग्रह, ब्रह्मचर्य,

त्रिरत्ने:- सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र

५ ) कारणे लिहा

१ ) वर्धमान महावीर यांना जीन म्हणू लागले?

उत्तर= शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टीने होणारी पीडा, यांचा स्वतावर काहीही परिणाम होऊ न देणे, म्हणजे विकारांवर विजय मिळवणे. असा विजय वर्धमान महाविर त्यांनी मिळवला होता म्हणून त्यांना जीन असे म्हणू लागले. जीन म्हणजे जिंकणारा.

२) गौतम बुद्धांना बुद्ध असे का म्हटले गेले

उत्तर=

गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. आईचे नाव होते मायादेवी, गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते. म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले

Comments

Popular posts from this blog