१. भारतीय उपखंड आणि इतिहास
१. भारतीय उपखंड आणि इतिहास
प्रश्न आणि उत्तरे
अ) खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
१ ) इतिहास म्हणजे काय?
उत्तर=इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांचे सुसंगत मांडणी होय.
२ ) मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो?
उत्तर= जगण्याच्या साधनांची मोबाई मुबलकता जेथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो .
३ ) डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते?
उत्तर= डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थावर अधिक अवलंबून राहावे लागते.
४) भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती?
उत्तर= हडप्पा संस्कृती भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती आहे.
ब ) खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
१ ) मानवी समाजजीवन कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते?
उत्तर= मानवी समाजजीवन खालील गोष्टीवर अवलंबून असते,
- आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्ये यावर अवलंबून असतात.
- समाज जीवन सुद्धा त्यावर अवलंबून असते.
- उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेशात राहणारे लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते.
- डोंगराळ प्रदेशात सुपीक जमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशात जमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्ये आणि भाज्या कमी प्रमाणावर उपलब्ध असतात. या सर्व गोष्टीवर मानवी समाज जीवन अवलंबून असते.
२ ) आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात?
उत्तर= खालील गोष्टी जगण्याची साधने असतात,
- आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात
३ ) "भारतीय उपखंड" असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात?
उत्तर=
- हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत.
- अफगानिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपल्या भारत देश मिळून तयार होणारा भूभाग "दक्षिण आशिया" या नावाने ओळखला जातो.
- याच भागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात.
- हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला होता.
क) कारणे लिहा
१ ) इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट असते
उत्तर= खालील कारणे आहेत
- आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. त्यांच्या आधाराने त्या त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते.
- जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल , तेथे मानव समाज दीर्घकाळ वस्ती करतो. कालांतराने या वस्त्यांचे ग्राम वसाहती आणि नगरे यात रूपांतर होते.
- पर्यावरण प्रदूषण, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली, की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. ग्राम वसाहती, नगरी उजाड होतात.
- अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात त्यावरून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते हे स्पष्ट होते.
२ ) लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते
उत्तर= खालील कारणांमुळे लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते
- पर्यावरणाचे प्रदूषण केल्यामुळे किंवा पर्यावरणाचं नुकसान केल्यामुळे कालांतराने तेथील साधन संपत्ती संपली की लोकांना गाव सोडून जावं लागतं.
- दुष्काळ पडल्यामुळे गाव सोडावे लागते
- देशाच्या सीमेलगत असणाऱ्या गावांना युद्धाच्यावेळी गाव सोडावे लागत
- किंवा जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली, की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. सर्व कारणामुळे लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते
ड ) डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा
उत्तर=
डोंगराळ प्रदेश लोकजीवन:-
- डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन कष्टाचे असते
- डोंगराळ प्रदेशात सुपीक शेत जमिनीची उपलब्धता अगदी थोडी असते
- त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्ये आणि भाज्या कमी प्रमाणावर उपलब्ध असतात
- अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थावर अवलंबून राहावे लागते
मैदानी प्रदेशातील लोकजीवन:-
- मैदानी प्रदेशातील राहणाऱ्या लोकांचे जीवन कमी कष्टाचेअसते
- सुपीक जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते
- तृणधान्ये आणि भाज्या जास्त प्रमाणावर उपलब्ध असतात
- अन्नासाठी शिकारीवर अवलंबून राहावे लागत नाही
वरील फरक डोंगराळ व मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकजीवनातील आहेत
ई ) पाठ्यपुस्तकातील भारत प्राकृतिक या नकाशा चे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा.
१ ) भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत?
उत्तर= हिमालय पर्वतरांगा आहेत
२ ) भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते?
उत्तर= रेशीम मार्ग,
३ ) गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो?
उत्तर= बांगलादेश
४ ) भारताच्या पुर्वेस कोणती बेटे आहेत?
उत्तर= अंदमान आणि निकोबार बेटे आहेत
५ ) थर चे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे?
उत्तर= उत्तर दिशेला आहे
Comments
Post a Comment