३ ) हडप्पा संस्कृती
३ ) हडप्पा संस्कृती
प्रश्न आणि उत्तरे
१ ) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१ ) या संस्कृतीला हडप्पा असे नाव का मिळाले असावे?
उत्तर= इ. स. 1921 मध्ये पंजाब मधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन झाले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे नाव मिळाले.
२) हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे?
उत्तर= नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यासारख्या प्रतीकांचा समावेश आहे.
३) हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत?
उत्तर= मलमली चे कापड इजिप्तला पुरवत असत.
२ ) प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल?
जसे- स्थळांविषयी माहिती मिळवाल, प्रदूषण रोखणे, ऐतिहासिक साधनांचे जतन इत्यादीबाबत.
उत्तर= प्राचीन स्थळांना भेटी येताना आम्ही तेथील स्थळाबद्दल सांगितलेली माहिती आमच्या वहीमध्ये नोंदवून ठेवू, जेणेकरून ते आम्हाला नंतर वाचता येईल, तेथील प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही तेथे कोणत्याही प्रकारचं पाणी बॉटल, वेफर्स, किंवा इतर कोणताही कागद तेथे टाकणार नाही, आम्ही सार्वजनिक मालमत्तेची कोणत्या प्रकारची नुकसान करणार नाही , त्याची जतन करू
३ ) मोहेंजोदडो येथील स्नानगृह चे चित्र रेखाटन करा.
![]() |
| मोहेंजोदडो |
४ ) हडप्पा कालीन लोक जीवनाची माहिती खाली दिलेल्या तक्त्यात लिहा.
उत्तर=
मुख्य पीक:- गहू, सातू
पोशाख:- उपरणे,
दागिने/ अलंकार:- माळा, बाजूबंद , कमरपट्टा, बांगड्या
५ ) एका शब्दात उत्तरे द्या. अशोक प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा व त्यांची उत्तरे लिहा.
उत्तर=
१ ) हडप्पा प्रथम उत्खनन- रावी नदीच्या काठी
२ ) स्नानगृह कोठे सापडले- मोहेंजोदडो
६ ) हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर जागतिक संस्कृती जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवा.
उत्तर=

Comments
Post a Comment